+91 9075441223 erigtstep@gmail.com

आमच्या बद्दल

आमचे विचार आणि आमची संकल्पना

आम्ही “निसर्गप्रेमी “

Nature Lovers

“Creating a nature Lovers Community”

 

आम्ही निसर्ग प्रेमी आहोत, आम्ही निसर्ग जोपासतो. त्यासाठीच आमचे पहिले पाऊल म्हणजे हरित निसर्ग प्रेमी समुदाय तयार करणे आणि जोपासने .

” खरा निसर्ग प्रेमी समुदाय “. जे लोक समान उत्कटतेने सहभागी होतात आणि जे लोक निसर्गाचा आनंद  घेऊ इच्छितात त्यांचे आम्ही स्वागत करतो.

थोडसं मनातलं…

होय, आम्ही निसर्ग प्रेमी आहोत,याचे कारण म्हणजे सुरवातीपासूनच आम्हाला आवड होती, झाडांची फळे तोडून खाण्याची दगडाने चिंचा, बोरं पाडून खाण्याची, विहिरीत पोहण्याची, शेतामध्ये काम करण्याची आणि काम झाल्यांनतर झाडाखाली बसून भरलेला वांग, मिरचीचा ठेचा, बेसन भाकरी खाऊन गार सावलीत झोप काढण्याची. त्याचबरोबर  शहरी भाषेत पशुपालन आणि आमच्या भाषेत गुरं-ढोरं आमच्याकडे  होती. यासगळ्या गोष्टी  आम्ही काही वर्षांपूर्वी करत होतो पण त्याचा आनंद त्यावेळी मिळत नव्हता कारण कि, आम्हाला वाटायचं आम्ही शहरात जावं. शहराचा आम्हाला हेवा वाटायचा कारण आम्हाला शहरातील  लाइफस्टाईल सुखद वाटायची.

परंतु आम्ही जेव्हा शहरात नोकरी-व्यवसाया निमित्त आलो, बराच काळ आणि वेळ घालवला तर आज शहरातील ती लाइफस्टाईल, नोकरी व्यवसायातून मिळणारा पैसा जो आम्हाला एकेकाळी सुखद वाटायचा तो आज नकोसा वाटायला लागलाय कारण पैसा आला म्हणजे व्यवहार आला आणि व्यवहार आला म्हणजे वेळ देणे आलेच. पैसा,नोकरी,व्यापार जपण्यासाठी वेळ खर्ची घालावाच लागतो. जर वेळ खर्ची गेलाय तर मी फक्त जन्माला आलो, पैसा कमावला, पण जे सुख पाहिजे किंवा हवंय ते अनुभवायचं राहूनच गेलं. तर मग आज मला असं वाटतंय मी खरा निसर्गप्रेमी होतो आणि आहे. कारण त्या ठिकाणी पैसा आणि व्यवहार हा जरी कमी असला तरी मी माझ्या सुखासाठी जगत होतो.  

या व्यवहाराने, नोकरीने मला कुठे सरांची उपमा दिली, कुठे मॅनेजर , कुठे मालक आणि शेवटी डेव्हलपर बनवून सोडलं. पण मी एकच शब्द ऐकण्यासाठी तरसलो आहे तो म्हणजे “निसर्ग प्रेमी”.

या सगळ्यात पैसा खूप आला आणि खूप गेला पण. कधी कर्ज घेतलं तर कधी कर्ज दिलंसुद्धा. मी मोठा झालो, व्यवहाराने मला खूप मोठं केलं पण जसं हवं तसं जगू शकलोच नाही. पण आता मला असं वाटतंय , हे सगळं काम करताना किंवा कामातून मला मिळालेल्या पदव्या, मान आणि मी माझ्या जीवनात आजपर्यंत खर्च केलेला वेळ, मी केलेले व्यवहार, व्यापार, नोकरी यांच्यातून मिळालेल्या अनुभवाचा योग्य वापर करून मला आज असं वाटतंय कि मी आता निसर्गप्रेमीच राहून माझी स्वतःची स्वप्न पूर्ण करावीत.

मला जे अनुभवायचंय , आवडतंय तसंच जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत त्याचा अनुभव घेऊ शकता. आणि तो फक्त अनुभव घ्यायचा म्हणून किंवा फक्त आणि फक्त आनंद घ्यायचा म्हणून तुम्ही आलात तरी विनामूल्य तुम्ही तो अनुभव घेऊ शकता. नुसत्या अनुभवाच्या पलीकडे तोच अनुभव तुमच्यासाठी कायम स्वरूपी तुमच्या मालकीचा, हक्काचा हवा असेल तरी तो तुम्हाला मिळेल यासाठी व्यवहार हा नाममात्र राहील.

माझ्या आजपर्यंतच्या माहितीतून आणि अनुभवातून मी माझ्याकडून शक्य होईल तेवढी सेवा व सल्ला तुम्हाला देऊ शकतो.

सगळ्यात आधी छंद आणि आवड जोपासू आणि त्यातूनच सगळे हेतू साध्य होतील असा आणि असाच व्यवहार करू, परंतु छंद आणि आवडीकडे जर कानाडोळा होत असेल किंवा पूर्ण होत नसेल तर व्यवहार झाला नाही तरी चालेल. आमचे विचार पटत असतील तरच आमच्यासोबत या ….

यातून आपले प्रेमाचे संबंध राहतीलच …..

धन्यवाद !

होय, आम्ही निसर्गप्रेमी …

जर तुम्हाला आमची कल्पना आवडली असेल  आणि जर तुम्ही आमच्या ध्येयावर विश्वास करता तर कृपया एकदा संपर्क करा.

 Nature Lover’s

         Creating a nature lovers community

“We love nature, feel nature. The very first step for us is to create and maintain a green community.”

© 2018 JK Nature Lovers.