+91 9075441223 erigtstep@gmail.com

शेत जमीन

 

जर तुम्ही फार्महाऊस प्लॉट, शेतजमीन किंवा गुंतवणूक यांच्या शोधात असाल तर आम्ही काही माहिती देऊ इच्छितो.ती माहिती तुमच्या उपयोगास पडली तर आजपर्यंतचा आमचा अनुभव योग्य आहे असे सिद्ध होईल. वरील तिन्ही गोष्टी जमिनीच्या संदर्भात असल्या तरी त्या बद्दल निर्णय घेताना त्याची संकल्पना वेगळीच आहे. तर तुम्ही अगोदर ठरवा की तुम्हाला शेतजमीन घ्यायचीच तर त्या ठिकाणी शेतीच करावी म्हणजे ती जमीन शेतीयोग्यच असावी. हा निर्णय घेतेवेळी यामधे अंतर, दर या गोष्टींचा विचार करू नये. कारण शेतीसाठी पूरक आवश्यक गोष्टी म्हणजे वीज, पाणी आणि रस्ता या मूलभूत गोष्टी असतील तर तुम्ही शेती कुठेही करू शकता. यामध्ये शेतीची सुपीकता, झोन, पडजमीन अशा काही गोष्टी असल्या तरी तुम्ही जमिनीच्या प्रकारानुसार शेती करू शकता.

डोंगर असेल तर तुम्ही झाडे लावा. आयुर्वेदिक वनस्पती फळझाडे किंवा ज्या शेतामध्ये मुरमाड असेल तर सीताफळ डाळिंब सारखी अनेक उत्पन्न घेता येतील काळी जमीन आणि पाणी असेल तर सगळ्या प्रकारचे उत्पन्न घेऊ शकतो आणि म्हणूनचं शेती घ्यायची असेल तर त्या ठिकाणी शेतीच करा जमीन पडीक ठेऊ नका कारण सरतेशेवटी जर आपण विचार केला तर जमीन घेतेवेळेस आपण आपल्या हौसेनूसार आपण गुंतवलेला पैसा तो जर जसाच्या तसा सुरक्षित ठेवायचा असेल तर किंवा आपली शेती करायची हौस किंवा इच्छा कमी झाल्यानंतर गुंतवणूक केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम अपेक्षित असेल तर शेती तुम्हाला करावीच लागेल अन्यथा या गोष्टी शक्य न झाल्यास योग्य वेळी जमीन विकून टाका कारण तुमच्या सारखंच ठराविक काळापर्यंत हौस म्हणून करणारे भरपूर लोक आहेत आनंद घ्या आणि योग्य रक्कम मिळेल तेव्हा विकून मोकळे व्हा.

वरील सर्व गोष्टी जरी बोचक वाटत असल्या तरी पैसे हा व्यवहारमाञ आहे. पैशामध्ये निसर्गाला तोलू नका निसर्गाने दिलेल्या गोष्टी जमीन, पाणी यांचा योग्य वापर करून फक्त उपभोग आपण घ्यावा पडीक अवस्थेत ठेऊ नये असे करून निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नये.

 

होय, आम्ही निसर्गप्रेमी …

जर तुम्हाला आमची कल्पना आवडली असेल  आणि जर तुम्ही आमच्या ध्येयावर विश्वास करता तर कृपया एकदा संपर्क करा.

 Nature Lover’s

         Creating a nature lovers community

“We love nature, feel nature. The very first step for us is to create and maintain a green community.”

© 2018 JK Nature Lovers.